मोहन कांबळे यांना पोलीस पदकाचा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:32 AM2021-05-11T04:32:46+5:302021-05-11T04:32:46+5:30
जाकादेवी : संगमेश्ववर तालुक्यातील घोडवली गावचे सुपुत्र व सध्या दापोली पोलीस स्थानकात कार्यरत असणारे पोलीस हवालदार मोहन ...
जाकादेवी : संगमेश्ववर तालुक्यातील घोडवली गावचे सुपुत्र व सध्या दापोली पोलीस स्थानकात कार्यरत असणारे पोलीस हवालदार मोहन रामचंद्र कांबळे यांनी पोलीस सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांतर्फे त्यांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मोहन कांबळे यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन त्यांनी शासकीय सेवा उत्तम प्रकारे बजावली. त्यांनी पोलीस क्षेत्रात केलेली कामगिरी अनेकांना प्रेरक ठरली. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात मोहन कांबळे यांनी शासनाला चांगली मदत केली आहे. त्यांचे माेठे भाऊ सुरेश कांबळे हे राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी पदावर, तर दुसरे भाऊ विजय कांबळे हे शिक्षण क्षेत्रात उच्चपदी कार्यरत आहेत. मोहन कांबळे यांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.