खेडमधील कन्याशाळा दुरुस्तीसाठी मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:01+5:302021-05-01T04:30:01+5:30
खेड : शहरातील कन्याशाळेचे छप्पर वर्षानुवर्षे गवताच्या विळख्यात अडकते. याशिवाय इमारतीच्या दुरूस्तीचे घोंगडेही भिजत पडले आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ...
खेड : शहरातील कन्याशाळेचे छप्पर वर्षानुवर्षे गवताच्या विळख्यात अडकते. याशिवाय इमारतीच्या दुरूस्तीचे घोंगडेही भिजत पडले आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी अद्याप प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. लॉकडाऊननंतर छताची दुरूस्ती होण्याची सुतराम शक्यता नसल्याने विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार कायमच राहणार आहे.
शहरातील कन्याशाळेतील दोन इमारतींमध्ये ८ वर्गखोल्या असून, दुसरी ते चाैथीपर्यंतचे वर्ग भरतात. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या प्राथमिक शाळेची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. पडझडीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला अजूनही जाग येत नाही. एकीकडे ही इमारत धोकादायक स्थितीत असताना दुसरीकडे दोन्ही इमारती पावसाळ्यात धोकादायक बनत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच धडे गिरवावे लागतात. धोकादायक स्थितीतील इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. मात्र, प्रस्ताव लालफितीतच अडकून पडला आहे. पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला असतानाही प्रशासनाला
अजूनही शाळेच्या दुरूस्तीसाठी वेळ मिळालेली नाही. त्यातच लॉकडाऊन सुरू असल्याने दुरूस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे.
...........................................
khed-photo304
खेड शहरातील कन्याशाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे.