पन्नास टक्क्यांहून अधिक प्रवासी नेणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:52+5:302021-06-24T04:21:52+5:30

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना काळात ५० टक्क्यांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी आणखी एका बोलेरो चालकावर जयगड पोलीस ...

More than fifty per cent of the passengers were charged | पन्नास टक्क्यांहून अधिक प्रवासी नेणाऱ्यावर गुन्हा दाखल

पन्नास टक्क्यांहून अधिक प्रवासी नेणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी कोरोना काळात ५० टक्क्यांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी आणखी एका बोलेरो चालकावर जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जून) वाटद खंडाळा नाका येथे करण्यात आली.

सिद्धेश सचिन चाफेकर (२६, रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप दाभाडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ब्रेक द चेन अनुषंगाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून त्याने आपल्या ताब्यातील बोलेरो कॅम्पर गाडी (एचआर-१७-डीटी-६३३७) मधून नियमबाह्य पद्धतीने ५० टक्क्यांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आला. २१ जूनला त्याच्यावर याच कारणासाठी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार जाधव करीत आहेत.

Web Title: More than fifty per cent of the passengers were charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.