बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

By Admin | Published: February 24, 2015 10:11 PM2015-02-24T22:11:03+5:302015-02-25T00:13:15+5:30

महावितरण कंपनी : महसुली उत्पादनातही झाली अडीचपट वाढ

More than half a million customers grew in the twelve years | बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

googlenewsNext

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी   जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी इमारतींची संख्या वाढत असल्याने नवीन घरांसाठी विजेच्या मीटरची मागणी वाढत आहे. २००२ साली जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या ३ लाख ६५ हजार २५० इतकी होती. २०१४ अखेर वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ५७ हजार ४२८ इतकी झाली आहे. गेल्या बारा वर्षात १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महावितरणचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अपार्टमेंटसची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सन २००२ मध्ये घरगुती ग्राहक ३ लाख २५ हजार ५२१, कृषिपंप १०,७८१, औद्योगिक ५४२५, सार्वजनिक पथदीप ८१८, तर अन्य ग्राहक १२६० इतके होते. २०१४मध्ये ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. २०१४ मध्ये घरगुती ग्राहक ४ लाख ४ हजार ६९९, वाणिज्य २८ हजार २०३, औद्योगिक ५५३७, कृषिपंप १२९५, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २०८३ ग्राहक आहेत. १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक बारा वर्षात वाढलेले दिसून येत आहेत.
ग्राहकांकडून वीज मीटरची मागणी वाढत असल्यामुळे २००२मध्ये जिल्ह्याला १४७ मेगावॅट इतकी वीज लागत असे. परंतु आता जिल्ह्याला १८० ते १८५ मेगावॅट इतकी वीज लागत आहे.
वीज ग्राहक वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलातही वाढ झालेली दिसून येत आहे. सन २००२मध्ये वर्षाला १७० कोटी असलेला महसूल आता ४९८ कोटी इतका झाला आहे. एकूणच महावितरणचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सेकंड होम्स्च्या संकल्पनेमुळे जिल्ह्यात घरांची संख्या वाढत आहे. घरे वाढल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाला साडेतीन ते चार हजाराने ग्राहकांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरणकडून महिन्याला वीजबिल देण्यात येत असल्याने दरमहा आॅनलाईन, एटीपी तसेच वीजबिल केंद्रावर वीजबिल भरले जाते. त्यामुळे महावितरणचा दरमहा कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. वीजबिल थकबाकीदारांवर कारवाई करताना वीजपुरवठाच खंडित केला जातो. शिवाय ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो. मार्चअखेरीस वसूली पूर्ण करण्यासाठी तर खास पथक कार्यरत असते.
शेतीपंपाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कृषिपंपाचे १४ हजार ७२४ इतके ग्राहक आहेत. २००२ ते २००७ पर्यंतची कृषिपंपाची आकडेवारी महावितरण कंपनीकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, २००८पासून शेतीपंप जोडणी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे दिसून येते.

वर्ष जोडण्या
२००८११८३८
२००९३८०
२०१०३९३
२०११४१४
२०१२६२८
२०१३५४५
२०१४७९२

Web Title: More than half a million customers grew in the twelve years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.