यंदा कर्तव्य आहे! लग्नाचा धुमधडाका जोरात, महिन्यांनुसार मुहूर्ताची तारीख..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:39 PM2023-11-29T15:39:21+5:302023-11-29T15:39:40+5:30
रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. ...
रत्नागिरी : काेकणात तुळशी विवाहानंतर लग्नाच्या बाेहल्यावर चढणाऱ्यांची लगीनघाई सुरू हाेते. साेमवारपासून (२७ नाेव्हेंबर) विवाह मुहूर्त सुरू हाेत आहेत. यावर्षी लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त असले तरी मे महिन्यात अवघे दोनच मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत तर जुलैमध्ये काही मुहूर्तच नाहीत. त्यामुळे यंदा कर्तव्य असणाऱ्यांना घाई करावी लागणार आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचे अधिकाधिक मुहूर्तावर लग्नगाठ बांधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.
वास्तविक दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुटीच्या दिवसात मे महिन्यातील १ व २ तारखेला मुहूर्त आहेत. त्यानंतर जूनच्या २९ व ३० तारखेलाच मुहूर्त आहेत. मे महिन्यात पाण्याची भासणारी टंचाई यामुळे सुटीतील मुहूर्तापेक्षा लवकरचा मुहूर्त शोधला जात आहे. शहरात तर सभागृहाच्या उपलब्धतेवर मुहूर्त ठरत आहे. सोमवारपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, हिवाळ्यात ३८ मुहूर्त तर उन्हाळ्यात २८ मुहूर्त आहेत.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर - २७, २८, २९
डिसेंबर - ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१
जानेवारी - २, ३, ४, ५, ६, ८, १७, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी - १, २, ४, ६, १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९
मार्च - ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०
एप्रिल - १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
मे - १, २
जून - २९, ३०
जुलै - ९, ११, १२, १३, १४, १५
यावर्षी एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत
- हिवाळ्यामध्ये ३८ मुहूर्त आहेत.
- उन्हाळ्यात २८ विवाह मुहूर्त आहेत.
- मे महिन्याच्या सुरुवातीला दोन तर जूनमध्ये शेवटचे दोन दिवस मुहूर्त आहेत.
मुलींपेक्षा मुलांच्या विवाहाची अधिक चिंता
- मुलींच्या वाढत्या जन्मदरामुळे मुलींपेक्षा आता मुलांच्याच विवाहाची चिंता मुलांच्या कुटुंबांमध्ये वाढली आहे. तुलनेने मुलांची संख्या मुलींपेक्षा कमी आहे.
- शिक्षणाचा टक्का मुलींमध्येही वाढला आहे. त्यामुळे शिक्षणातील बरोबरी/ त्यापेक्षा अधिक शोधली जाते. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शिक्षणाबरोबर शहरी भागातील मुलांना पसंती असल्याने ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचे वय निघून जात आहे.
- याेग्य जोडीदार न मिळाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघून जाते. त्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून युवक व्यवसनाधीन होत चालल्याने नवी समस्या उभी राहिली आहे.
गतवर्षीपेक्षा यावर्षी निश्चितच मुहूर्त अधिक आहेत. यावर्षीच्या विवाह मुहूर्तामध्ये गुरू, शुक्राचा अस्त नसल्यामुळे प्रत्येक महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. मात्र, तरीही गुरुबल व चंद्रबल पाहूनच विवाहाच्या तारखा ठरविल्या जात आहेत. सध्या हिवाळ्यातील विवाह मुहूर्त ठरविण्याकडे यजमान मंडळींचा कल वाढला आहे. - अजय जोशी, पुराेहित