फिनोलेक्स ॲकॅडमीला ‘मोस्ट इनोव्हेटीव्ह’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:45+5:302021-09-25T04:34:45+5:30
रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड ॲण्ड कॉन्फरेन्स २०२१ ...
रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅशनल एज्युकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड ॲण्ड कॉन्फरेन्स २०२१ मध्ये ‘मोस्ट इनोव्हेटीव्ह ॲण्ड लिडिंग इंजिनीअरिंग कॉलेज २०२१’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या कार्यक्रमात २५० हून अधिक शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये यांनी आपला सहभाग दर्शवला होता. या परिषदेला इंजिनियस ब्युरोक्रॅट्स, ग्लोबल लीडर, अनेक सीईओ आणि राजकारणी यांनी सन्मानित केले. हा सोहळा सोशल मीडिया आणि न्यूज साइट्सच्या विविध डिजिटल माध्यमांमधून सादर करण्यात आला आहे.
या पुरस्कारच्या सर्वेक्षणासाठी महाविद्यालयाची मूलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन याची पाहणी करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क, संशोधन अभिमुखता आणि नोकरीतील संधी या गोष्टीचा विचार करण्यात आला. या यशाबद्दल फिनोलेक्स ॲकॅडमीच्या अध्यक्ष अरुणा कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.