टाॅवर गावातून हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:54+5:302021-08-02T04:11:54+5:30
हाजीन व पीपीई किटचे वाटप लांजा : दि प्राईड इंडिया या संस्थेच्या वतीने लांजा व संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये शेती ...
हाजीन व पीपीई किटचे वाटप
लांजा : दि प्राईड इंडिया या संस्थेच्या वतीने लांजा व संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये शेती व शेतीपूरक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या संस्थेच्या लांजा कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात आशासेविका व अंगणवाडी सेविकांना हायजीन किट व पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
लसीकरण करा
रत्नागिरी : महापुरात सापडलेल्या चिपळूण, खेड, राजापूरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी शंभर टक्के लसीकरणावर भर देण्यात यावा आणि जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी महाराष्ट्र समविचारी मंचातर्फे करण्यात आली आहे. जिल्हा कार्यक्रम आढावा बैठक झाली. यावेळी बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, नीलेश आखाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आस्था फाउंडेशनची मागणी
रत्नागिरी : महापुरात दिव्यांगांचे काय झाले असेल असा प्रश्न कुणालाच पडला नाही. त्यामुळे आस्था सोशल फाउंडेशनने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात आधाराची गरज आहे.काही भागात मदत मिळाली असून, उर्वरित भागांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पत्र आस्था फाउंडेशनने निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना दिले.
१५ ऑगस्टला उपोषण
खेड : शहरातील एल.पी.इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार शिंदे यांना अद्यापही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसह कोणतीही निवृत्तीची देयके न मिळाल्याने त्यांची परवड सुरु आहे. पत्रव्यवहार करूनही न्याय न मिळाल्याने १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
परीक्षेत यश
पावस : रत्नागिरी तालुक्यातील स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिरच्या पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था, ग्रामस्थ व मुख्याध्यापकांनी कौतुक केले.