खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 06:53 PM2023-08-15T18:53:50+5:302023-08-15T18:54:18+5:30

या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

MP Vinayak Raut's hunger strike; The Guardian Minister ordered an inquiry into the land scam | खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

googlenewsNext

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या अदानी ग्रुपविरोधात खासदार विनायक राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने बाहेर काढला होता. प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यांनी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन या घोटाळ्याबाबत माहिती दिली होती. त्याच्या आधारे खासदार विनायक राऊत यांनी न्याय मिळाला नाही म्हणून उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज उपोषण केले. 

अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या व त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार खासदार विनायक राऊत यांनी पालकमंत्री यांच्याशी चर्चा करताना मांडला. यावेळी समिती गठीत करुन चौकशी केली जाईल. मंत्रालयात याविषयी बैठक लावली जाईल या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.

Web Title: MP Vinayak Raut's hunger strike; The Guardian Minister ordered an inquiry into the land scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.