कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा : भास्कर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 06:51 PM2021-02-09T18:51:46+5:302021-02-09T18:54:47+5:30
mahavitaran Bhaskar Jadhav Ratnagiri-मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
असगोली : मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणचीरत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. महावितरणचे गणेश गलांडे यांनी ह्यएक गाव एक दिवसह्ण उपक्रमाची माहिती दिली. वीज ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. साचेबंद उत्तर देऊन त्याला परत पाठवू नका. वीज अपघातानंतर जबाबदारी स्वीकारा, अशा सूचना भास्कर जाधव यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.
या वेळी सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, विनायक मुळे नगरसेविका नीलिमा गुरव, मृणाल गोयथळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, आबलोलीच्या सहाय्यक अभियंता जयश्री माळकर, रानवीचे सहाय्यक अभियंता बसवराज कलशेट्टी, गुहागरच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे, शृंगारतळीतील सहाय्यक अभियंता सनी पवार, तळवलीचे कनिष्ठ अभियंता रोहित दाबेराव, पालशेतच्या सहाय्यक अभियंता सुमित्रा सपकाळ उपस्थित होते. प्रास्ताविक जयश्री माळकर यांनी केले.
कोकणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा
कोकणाला न्याय द्यायचा असेल तर या उपक्रमाबरोबरच स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागेल. आमच्याकडे थकबाकी नाही. महाराष्ट्राला केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पातून, निती आयोगातून निधी कमी मिळतो, कारण आपल्याकडे थकबाकी नाही आणि सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. तीच परिस्थिती कोकणाची. आमच्याकडे विजेची, कर्जाची थकबाकी नाही. म्हणून आमच्याकडे विकासाबाबत दुर्लक्ष केले जाते. हा विषय आकडेवारीनिशी सरकारकडे मांडावा, अशी मागणी केली पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशीही सूचना भास्कर जाधव यांनी केली.