आगवे, काेट येथे महावितरणचे सबस्टेशन मंजूर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:14+5:302021-08-01T04:29:14+5:30

लांजा : तालुक्यातील आगवे, काेट येथे महावितरणचे सबस्टेशन मंजूर व्हावे, अशी मागणी खानवली पंचायत समिती गणातील ग्रामस्थांनी केली ...

MSEDCL substation at Agave, Kate should be sanctioned | आगवे, काेट येथे महावितरणचे सबस्टेशन मंजूर व्हावे

आगवे, काेट येथे महावितरणचे सबस्टेशन मंजूर व्हावे

Next

लांजा : तालुक्यातील आगवे, काेट येथे महावितरणचे सबस्टेशन मंजूर व्हावे, अशी मागणी खानवली पंचायत समिती गणातील ग्रामस्थांनी केली आहे. भाजपतर्फे लांजा तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत खानवली पंचायत समिती गणातील सापुचेतळे विठ्ठल मंदिर येथे बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला महावितरणचे पूनस फिडरचे अधिकारी पुरुषोत्तम वड्डा व सर्व वायरमन उपस्थित हाेते. या बैठकीत खानवली पंचायत समिती गणातील गावांमध्ये कायमस्वरूपी वायरमन मिळावा, जुन्या विद्युत वाहिन्या बदलून वीजखांबासह नव्याने टाकाव्यात, रात्रीच्या वेळेस चिरे खाणींना मोठ्या प्रमाणात वीज लागत असून, त्यामुळे इतर ठिकाणी विजेचा प्रकाश अंधुक होत असल्याने त्यावर बंदी घालावी, अशा आशयाचे पत्र लांजा तालुका भाजपतर्फे देण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुकाध्यक्ष महेश खामकर, तालुका प्रभारी वसंत घडशी, सरचिटणीस विराज हरमळे, बळीराजा शिक्षण संस्था अध्यक्ष मांजरेकर, अनिल गुरव, अनंत रायकर, वाघोजी खानविलकर, राजू नेवाळकर, अशोक मोडक यांच्यासह आगवे, कोट गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------------

लांजा तालुक्यातील विजेच्या संदर्भात सापुचेतळे येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: MSEDCL substation at Agave, Kate should be sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.