मुक्ता रेडीज -साडविलकरचे एम. डी. आयुर्वेद परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:31 AM2021-03-31T04:31:29+5:302021-03-31T04:31:29+5:30
अडरे : बाजारपेठेतील प्रथितयश व्यापारी कैलासशेठ रेडीज यांची सुकन्या तसेच चिपळूण अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी व विविध ...
अडरे : बाजारपेठेतील प्रथितयश व्यापारी कैलासशेठ रेडीज यांची सुकन्या तसेच चिपळूण अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी व विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांवर कार्यरत असणारे नयन साडविलकर यांची सून मुक्ता हिने यशवंत आयुर्वेद महाविद्यालय, कोडोली कोल्हापूर येथून एम. डी. आयुर्वेद या परीक्षेत यश संपादन केले. वनस्पती शास्त्र या विषयात तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे.
मुक्ताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एस. पी. एम. इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम येथून झाले असून, तिने उच्च माध्यमिक शिक्षण डी. बी. जे. महाविद्यालयात घेतले आहे. त्यानंतर पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय, वरळी, मुंबई येथून तिने बी. ए. एम. एस. ही पदवी मिळवली. यापूर्वी मुक्ताने कोवॅस व्यायाम मंदिर या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, अनेक स्पर्धांमध्ये मानाची पारितोषिके मिळवली आहेत, तसेच अनेक योगपटूंना भारतात तसेच परदेशात योगासनांचे प्रशिक्षक म्हणूनही मार्गदर्शन केलेले आहे. मुक्ताने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल रेडीज आणि साडविलकर परिवाराबरोबरच वैश्य समाजबांधव तसेच अनेक मान्यवरांकडून मुक्ताचे तसेच तिचे पती नितीश साडविलकर यांचे अभिनंदन केले जात आहे.
................
पासपोर्ट फोटो आहे.