जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:41 AM2019-07-15T11:41:56+5:302019-07-15T11:59:44+5:30
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी ९.३० वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला असून दापोली-खेड हा मार्ग बंद झाला तर मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सकाळी ७.१० वाजताच गाठल्याने सकाळी ९.३० वाजल्यापासून रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारीही जोरदार फटका बसला. मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराची बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेला पाऊस आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात पडणारा पाऊस यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढली आहे. सह्याद्री खोऱ्यातील ३२ गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क कुठला आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच चिपळूण शहरात पाणी वाढू लागले. चिपळूण बाजार पुलावरून पाणी वाहू लागले आहे ते दाखवणे महामार्गावरील सेनगाव पाण्यात आलेले आहे. प्रथम बाजारपेठ भाग आणि त्यानंतर चिंचनाका भाग पाण्याखाली गेला. शहरातील मुख्य बस स्थानकादरम्यानही ढोपरभर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घराःंना धोका निर्माण झाला आहे.
रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे.
चिपळूणप्रमाणेच खेडलाही पावसाचा फटका बसला आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. त्याचप्रमाणे शहरातील मच्छीमार्केटही पाण्याखाली गेले आहे. जगबुडी नदीचे पाणी ७ मीटरपर्यंत वाढल्यानंतर धोक्याची सूचना दिली जाते. आता पाणी आठ मीटरपर्यंत वाढले आहे.
रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
रत्नागिरी-गुहागर भातगाव मार्गे वाहतूक बंद झाली आहे. रस्त्यावर मोठे दगड व दरड कोसळल्याने तसेच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. गुहागर-भातगाव-रत्नागिरी मार्ग मेढे तर्फे फुणगुस येथे मोठी दगड व दरड कोसळल्याने तसेच रस्ता वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे.
दापोली-खेड हा मार्ग बंद
आवाशी गावात नवीन पूल सुरक्षित असून देऊळ वाणी आवाशी देऊळवाडीकडे जाणारा पूल तुटला आहे, त्याचे सध्या बांधकाम सुरू होते. रात्रीपासून पावसात पाऊस सुरू असून नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. दस्तुरी-साखरोळी दापोली मार्गावर पानी आले असून दस्तुरी येलवली नदीला पूर आला आहे. यामुळे सॉ मिल व बेघर वसाहतमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.