आठवडाभरात तीन वेळा बंद पडला मुंबई - गोवा महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 09:07 PM2019-07-12T21:07:02+5:302019-07-12T21:10:24+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु

Mumbai-Goa highway closed three times a week | आठवडाभरात तीन वेळा बंद पडला मुंबई - गोवा महामार्ग

यापूर्वी रविवार ७ जुलै रोजी व गुरुवारी १० जुलै रोजी रात्री आठ तास वाहतूक ठप्प झाली होती.

Next
ठळक मुद्देमुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक एक तासाने एकेरी सुरूखेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने शुक्रवारी सकाळी पुन्हा धोक्याची पातळी गाठल्याने ७.३० वाजता या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, एका तासाने ८.३० वाजण्याच्या सुमाराला पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आठवड्यात महामार्ग बंद होण्याची ही तिसरी घटना आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदी पात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, १२ जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला  जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली. यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई - गोवा महामार्गावर पोलिसांच्या देखरेखीखाली एकेरी  वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

मात्र, काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी ७.५० मीटर झाल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. यापूर्वी रविवार ७ जुलै रोजी व गुरुवारी १० जुलै रोजी रात्री आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. 

Web Title: Mumbai-Goa highway closed three times a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.