मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील उड्डाण पुलाचा भाग खचला, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:56 PM2022-07-19T16:56:04+5:302022-07-19T16:56:34+5:30

असगणी फाटा येथे उभारलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग धोकादायक पद्धतीने खचला

Mumbai Goa National Highway four lane flyover part collapsed | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील उड्डाण पुलाचा भाग खचला, अपघाताची भीती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील उड्डाण पुलाचा भाग खचला, अपघाताची भीती

googlenewsNext

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या दर्जावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना यावर्षी पावसाळ्यात तालुक्यातील असगणी फाटा येथे उभारलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग धोकादायक पद्धतीने खचला आहे. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करत आहेत.

तालुक्यातील खवटी ते परशुराम या भागात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. या भागात सिमेंट काँक्रीटचे बनवलेले नवीन चारपदरी रस्ते अनेक ठिकाणी भेगा गेल्याने धोकादायक बनले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या असून, भरावाचा रस्ता खचू लागला आहे.

खेड तालुक्यातील दाभीळ नाका ते दाभीळ शाळा या भागात रस्ता भराव करून उंच करण्यात आला आहे. असगणी, अंजनी गावाकडे जाण्यासाठी अंडरपास रस्ता व चौपदरी महामार्गासाठी उड्डाणपूल येथे बांधण्यात येत आहे. ठेकेदार कंपनीने पावसाळ्यापूर्वी घाईघाईत येथे पूल व दोन पदरी सिमेंटचा रस्ता तयार करून वाहतुकीला खुला केला. मात्र, या भागातील पुलावरच सिमेंटचा रस्ता खचल्याने कामाचा दर्जा समाेर आला आहे.

मुंबई-गोवा चारपदरी महामार्गलगत खेडमध्ये अनेक भागांत बाजूपट्टीचे कामच अनेक ठिकाणी मजबूत नसल्याने रस्त्याच्या बाजूला वाहने चिखल रुतून चिखल महामार्गावर येत आहे. मुसळधार पावसात चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सिमेंट रस्त्यावर सर्वच ठिकाणी भेगा गेल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे.

Web Title: Mumbai Goa National Highway four lane flyover part collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.