भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:58 PM2019-05-06T16:58:20+5:302019-05-06T17:01:13+5:30

मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.

 Mumbaikar Pareh was arrested by the villagers, and the police did it | भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवाली

भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवाली

Next
ठळक मुद्दे भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवालीग्रामस्थांचा तीन तास मंदिरासह त्या पाचजणांना घेराओ

चिपळूण : मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.


सर्व कार्यक्रम आटोपून परत फिरण्याच्या तयारीत असतानाच ग्रामस्थांनी गाडी अडवून धरली. तेव्हा एकूण ८ जणांपैकी तिघांनी पळ काढला तर ५ जण ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. येथे कशासाठी आलात? वरती डोंगरात काय करत होतात? कुठून आलात, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. तेव्हा ती माझी स्वत:ची असून, माझ्या जागेत धार्मिक विधी करण्यासाठी आलो होतो, असे उत्तर प्रवीण पांडुरंग सकपाळ यांनी दिले. तसेच आपण येथील धामणदेवी गावाचा असल्याचे त्याने ग्रामस्थांना सांगितले.


ज्या डोंगराळ भागात हे सर्व घडले त्याठिकाणी ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा भयानक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. जिवंत कोंबड्या मान कापून तडफडत ठेवण्यात आल्या होत्या तर दोन कोंबड्या जिवंत सोडण्यात आल्या होत्या. कोंबड्यांचे रक्त नारळ, केळे व अन्य काही वस्तुवर शिंपडण्यात आले होते.

शेकडो अंडी परिसरात फोडण्यात आली होती. फळे व भाज्याही कापून ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांनी मंदिर परिसरातून पाचही मुंबईकरांना शनिवारी अमावास्या असताना चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या पेढे गावात लाल रंगाची गाडी दाखल झाली.

सकाळी ९ वाजता ही गाडी येथे आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. गाडी मुंबईची असून, त्यावर काही भोंदूबाबांचे फोटोही चिकटवलेले होते. त्यामुळे पेढेतील काही ग्रमस्थांना संशय आला आणि त्यातूनच या ग्रामस्थांनी या लोकांवर पाळत ठेवली. ग्रामस्थांचा हा संशय खरा ठरला.गाडीसह ताब्यात घेतले. त्यांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती. .

सखोल चौकशी करणार

हे लोक कोण व येथे डोंगरावर ते काय करत आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहजासहजी ते लक्षात येत नव्हते. त्याठिकाणी काहीतरी वेगळे चालले आहे असा संशय ग्रामस्थांना आला होता. त्यामुळे हे मुंबईकर परत फिरण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ गावच्या मंदिर परिसरात करत होते. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण चौकशी व तपास केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title:  Mumbaikar Pareh was arrested by the villagers, and the police did it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.