मदतीला धावले मुंबईकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:46+5:302021-06-16T04:42:46+5:30
२. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषाप्रमाणे सोमवारपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवेल, ...
२. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषाप्रमाणे सोमवारपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवेल, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. जिल्ह्यातील भिन्न प्रशासकीय क्षेत्रामध्ये संबंधित क्षेत्रातील कोविड-१९ पॉझिटिव्हिटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त बेड्स यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनाच्या स्तराविषयी निर्देश देण्यात आले आहेत.
३. खेड तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला वेग आला असून, आतापर्यंत तालुक्यात ५,५६९ जणांनी कोव्हॅक्सिनचा तर २२,६७९ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३,५७९ तर कोविशिल्ड लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या १,३०५ इतकी आहे. तालुक्यात तळे, कोरेगाव, फुरुस, आंबवली, वावे, लोटे, शिव, तिसंगी ही प्राथमिक केंद्रे तर खेड नगरपालिका, आवाशी, कळंबणी, जामे, घरडा, पोसरे, सात्विनगाव, लवेल आणि खेड शहरातील सहजीवन विद्यालय या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.