चिपळुणात वृद्धाचा किरकोळ कारणावरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:07+5:302021-07-27T04:33:07+5:30
चिपळूण : तालुक्यातील येगाव-बौद्धवादी येथे वृद्धाचा किरकोळ कारणावरून खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा ...
चिपळूण : तालुक्यातील येगाव-बौद्धवादी येथे वृद्धाचा किरकोळ कारणावरून खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. नथुराम भागुराम जाधव (६७, रा. येगाव बौद्धवाडी नं. २, चिपळूण) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याप्रकरणी विनोद चंद्रकांत कदम (रा. येगाव बौद्धवाडी नं. २, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नमिता नथुराम जाधव (५५, रा. येगाव बौद्धवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेतील मयत झालेले नथुराम जाधव हे विनोद कदम राहत असलेल्या बौद्धवाडीतील महिलांविषयी नेहमी अश्लील शेरेबाजी करत असत. याविषयी विनोद कदम याने जाधव यांना विचारणा केली. तरीही जाधव हे महिलांविषयी अश्लील बोलत असत. त्यामुळे कदम याच्या मनात जाधव यांच्याविषयी राग होता. तोच राग मनात धरुन नथुराम जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दांडक्यासह त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या डोक्यावर, कपाळावर दांडक्याने जोरात फटके मारुन जीवे ठार मारले. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सावर्डे पाेलीस करत आहेत.