मुरूड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:46+5:302021-05-30T04:25:46+5:30

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची सुटका करून ...

Murud Beach Olive Ridley saves turtle | मुरूड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

मुरूड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

Next

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य व ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची सुटका करून जीवदान दिले.

या किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या अनेक माद्या अंडी घालण्यासाठी येतात. त्यांचे संरक्षण करून येथील ग्रामस्थ व त्या अंड्यामधून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सुरक्षित पुन्हा पाण्यात सोडण्याचं काम करतात. याच जातीचे कासव शनिवारी सकाळी मुरुड समुद्र किनारी पूर्णपणे जाळ्यात फसले हाेते. याचठिकाणी राज साळवी, रोशन जाधव, ओंकार जाधव, किशोर कापडी आणि ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य राजेश शिगवण हे नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारत होते. त्यावेळी हे कासव जाळ्यात अडकलेले दिसले़ शिगवण व त्यांच्या या सहकाऱ्यांनी जाळे कापून कासवाची सुटका केली.

-------------------------

गेल्यावर्षी अशी जाळ्यात अडकलेली चार कासवं सोडली आहेत़ तसेच जाळ्यात अडकून काही मृत कासवेही किनारी आली हाेती़ त्यांना आम्ही तिथेच पुळणीत खड्डा मारून पुरली आहेत़ ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे. असेच जर हे होत राहील तर निसर्गाचा समतोल राखणे कठीण होऊन बसेल़

- राजेश शिगवण, सदस्य, ग्रामसुरक्षा दल

--------------------------------

दापाेली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान देण्यात आले़

Web Title: Murud Beach Olive Ridley saves turtle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.