माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहीम आबलोलीतही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:11+5:302021-05-06T04:33:11+5:30
आबलोली : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार, गुहागर ...
आबलोली : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार, गुहागर तालुक्यातील आबलोली येथे पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
गावात दोन पथके तयार करण्यात आली असून, दरदिवशी ५० कुटुंबांना भेट देऊन, त्यांची नोंदणी, तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, कोरोनासदृश्य लक्षणे आदींबाबत माहिती घेतली जाणार आहे, तसेच कोरोना आपत्तीच्या काळात घ्यावयाची काळजी, लसीकरण याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मोहिमेत सरपंच तुकाराम पागडे, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामसेवक बी.बी. सूर्यवंशी, तलाठी आनंद काजरोळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, पूजा कारेकर, मीनल कदम, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ यांच्यासह शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस सहभागी झाले आहेत.