नंदू कदम ठरले उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:37 AM2021-08-18T04:37:25+5:302021-08-18T04:37:25+5:30
चिपळूण : तालुक्यातील दोणवली गावचे सुपुत्र व महावितरण कंपनीच्या खेड उपकेंद्राचे प्रधान यंत्र चालक नंदू कदम यांची कंपनीने ‘उत्कृष्ट ...
चिपळूण : तालुक्यातील दोणवली गावचे सुपुत्र व महावितरण कंपनीच्या खेड उपकेंद्राचे प्रधान यंत्र चालक नंदू कदम यांची कंपनीने ‘उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी’ म्हणून निवड केली आहे. या निवडीबद्दल महावितरण विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोणवली गावचे सुपुत्र असलेले नंदू कदम महावितरणमध्ये गेली २२ वर्ष कार्यरत आहेत. या विभागात मंडणगडमध्ये २१ ऑगस्ट १९९८ रोजी सुरुवात केली. नंतर खेड, चिपळूण, गुहागर तर आता खेडमध्ये कार्यरत आहेत. या विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल महावितरण कंपनीने उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी म्हणून त्यांची निवड केली आहे. स्वातंत्र्यदिनी त्यांचा सन्मान करण्यात आला.
दोणवली विकास मंचचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. यामुळे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आपण आतापर्यंत महावितरण विभागात प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल कंपनीने जो आपला सन्मान केला आहे, याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, अशी भावना नंदू कदम यांनी व्यक्त केली आहे.