बा समुंदरा.. शांत हो; रत्नागिरीत नारळी पौर्णिमा उत्साहात
By मनोज मुळ्ये | Published: August 30, 2023 04:07 PM2023-08-30T16:07:51+5:302023-08-30T16:08:22+5:30
रत्नागिरी : मासेमारी हंगाम सुरू होण्याचा पारंपरिक दिवस म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. ...
रत्नागिरी : मासेमारी हंगाम सुरू होण्याचा पारंपरिक दिवस म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड तसेच गावडेआंबेरे येथे खारवी समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीच्या वेशभुषा करुन समुद्राची पूजा केली आणि समुद्राला शांत होण्याचे आवाहन करतानाच मासेमारी व्यवसायात बरकत देण्याची प्रार्थनाही केली.
रत्नागिरी जवळच्या पुर्णगड येथे नारळी पोर्णिमेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यानिमित्त नारळाची मोठ्या आकाराची प्रतिकृती तयार करुन त्याची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वेशभुषा करुन कोळी बांधवांनी समुद्रात नारळ सोडून समुद्राला शांत होण्याची विनंती केली. पूर्णगडप्रमाणेच गावडे आंबेरे येथेही ढोलताशांच्या गजरात नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली.