नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या १५ रूग्णवाहिका प्रयाग कुंभच्या सेवेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:53 PM2019-01-21T16:53:38+5:302019-01-21T16:56:06+5:30
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या १५ रूग्णवाहिका येथील कुंभमेळ्याच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. दोन महिने त्या येथे आजारी, जखमी, दुर्घटनाग्रस्त साधू-संतांसाठी व येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी विनाशुल्क कार्यरत आहेत. कुंभमेळ्यात हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
रत्नागिरी : श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या १५ रूग्णवाहिका येथील कुंभमेळ्याच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. दोन महिने त्या येथे आजारी, जखमी, दुर्घटनाग्रस्त साधू-संतांसाठी व येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी विनाशुल्क कार्यरत आहेत. कुंभमेळ्यात हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
या रुग्णवाहिका साधूग्राममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या महत्वाच्या चौकात त्या कार्यरत आहेत. येथील आजारी, जखमी साधूंसंताना, भाविकांना दवाखान्यात पोहोचवण्याचे कार्य त्या मोफत करत आहेत. येथे एका ठिकाणी नुकतीच आग लागली होती. त्यावेळी या रूग्णवाहिकांची मोठी कामगिरी बजावली आहे.
संस्थानने साधूग्राममध्ये दोन फिरते दवाखाने सुरू केले आहे. येथे उभारलेल्या अयोध्यानगरीमध्ये एक दवाखाना कार्यरत आहे. त्यासाठी दहा डॉक्टर्स, वीस नर्स कार्यरत आहेत. त्याचा लाभ अजारी साधूसंत व भाविक घेत आहेत. एकूणच या दोन्हीही सेवा येथे कौतुकाचा विषय ठरला आहे.