राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिची भारतीय संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:43 PM2023-03-19T18:43:52+5:302023-03-19T18:44:00+5:30

गतवर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत अपेक्षा सहभागी झाली होती, तेथेही तिने सुवर्णपदक मिळविले होते.

National Kho-Kho player Preksha Sutar has been selected in the Indian team | राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिची भारतीय संघात निवड

राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिची भारतीय संघात निवड

googlenewsNext

मेहरून नाकाडे
रत्नागिरी : राष्ट्रीय खो-खो पटू रत्नकन्या अपेक्षा अनिल सुतार हिची भारतीय संघात निवड झाली आहे. आसाम येथे होणाऱ्या चाैथ्या आशियाई महिला-पुरूष, चॅम्पियनशीप स्पर्धेत अपेक्षा सहभागी होणार आहे. आशियाई खंडातील १४ देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सोमवार दि. २० मार्च ते गुरूवार दि. २३ मार्च अखेर चाैथी आशियाई स्पर्धा आसाम येथे होत आहे. या स्पर्धेसाठी अपेक्षा आसाम येथे रवाना झाली आहे. भारतीय संघातून खेळण्याची संधी अपेक्षाला प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय खेळाडू एेश्वर्या सावंत पाठोपाठ अपेक्षा सुतार हिनेही खो-खो खेळातील चमकदार कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अपेक्षा पाचवीत असल्यापासून खो-खाे खेळत आहे. रा.भा.शिर्के शाळेची विद्यार्थिनी असून तिला विनोद मयेकर, पंकज चवंडे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. अपेक्षा वाणिज्य शाखेची पदवीधर झाली असून उत्कृष्ट खेळामुळे ती विविध गटातून जिल्हा, विभागिय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. गतवर्षी नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत अपेक्षा सहभागी झाली होती, तेथेही तिने सुवर्णपदक मिळविले होते.

अपेक्षा हिच्या उत्कृष्ट खेळामुळे खोखो क्षेत्रातील मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १८ वर्षे वयोगटातील जानकी पुरस्कार, खुल्या गटातील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार अपेक्षाने मिळविला आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी सचिव संदीप तावडे यांचे अपेक्षाला मार्गदर्शन लाभत आहे. अपेक्षा हिच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून काैतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: National Kho-Kho player Preksha Sutar has been selected in the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.