वराडकर बेलोसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:52+5:302021-09-27T04:33:52+5:30
दापाेली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर कला, रा. व्ही. बेलोसे वाणिज्य व कै. ...
दापाेली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर कला, रा. व्ही. बेलोसे वाणिज्य व कै. शांतिलाल जैन विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना दिन ऑनलाईन साजरा करण्यात आला.
प्रा. विशाल वैराट यांनी प्रमुख पाहुणे डॉ. संजय पाटोळे यांचा परिचय करून दिला. डॉ. संजय पाटोळे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन आपण का साजरा करतो, त्याची उद्दिष्टे, संकल्पना, राष्ट्रीय सेवा योजनेत काम करीत असताना व्यक्तिमत्त्व विकास कसा होतो, याबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक विश्वंभर कमळकर यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश निंबाळकर, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक विश्वंभर कमळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी प्रा. एफ. के. मगदूम, सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रा. विशाल वैराट, प्रा. समृद्धी खताते उपस्थित होते.