देव-घैसास-कीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:28+5:302021-09-27T04:33:28+5:30
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात ...
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होत्या.
मधुरा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी एनएसएस गीत सादर केले. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रा. ऋतुजा भोवड यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. दीप्ती कदम यांनी मानले. कार्यक्रमाला एनएसएस विभागातील प्रा. सोनाली जोशी, प्रा. निलोफर बन्नीकोप, प्रा. रिया बंडबे, प्रा. वैभव कीर शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.