चिपळूणमध्ये राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जुई ढगे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 01:33 PM2017-11-25T13:33:17+5:302017-11-25T13:36:23+5:30

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे.

National shooter Julie Dhage injured in a state-level Archery tournament in Chiplun | चिपळूणमध्ये राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जुई ढगे जखमी 

चिपळूणमध्ये राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जुई ढगे जखमी 

googlenewsNext

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यमानाने सब ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला शनिवारी (25 नोव्हेंबर)डेरवणमध्ये सुरुवात झाली. यात राज्यभरातून अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरून जाणारी पुण्याची नॅशनल खेळाडू तेरा वर्षीय जुई ढगे हिच्या हातात आरपार हातातील घुसून ती जखमी झाली.

जुई ढगेला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी याबाबतची माहिती दिली. जुई मैदानातून बाहेरून जात असताना हा प्रकार घडला.  

 

Web Title: National shooter Julie Dhage injured in a state-level Archery tournament in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा