राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:19+5:302021-09-24T04:37:19+5:30
गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील ...
गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील पाटपन्हाळे येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.
संचालकपदी रिसबूड
दापोली : दापोली ग्रामीण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी संजय रिसबूड यांची नुकतीच निवड करण्यात आली. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर यांच्याहस्ते रिसबूड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष सचिन मालू, बिलला रखांगे, निलेश जालगावकर यांच्यासह संचालक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
श्रद्धा वझे प्रथम
लांजा : येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण येथील श्रद्धा वझे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून सिंधुदुर्ग येथील सिद्धी परब आणि रत्नागिरीतील अंजली पिलणकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
अवैध वाळू उत्खनन
आवाशी : खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागातील जगबुडी नदीमध्ये हातपाटीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन सुरु झाले आहे. या परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील लोकांच्या दृष्टीने हे अवैध उत्खनन पडत आहे. मात्र तरीही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हे अवैध वाळू उत्खनन का दिसत नाही, असा प्रश्न या लोकांकडून विचारला जात आहे.
टेक्निशियन कार्यशाळा
रत्नागिरी : विजेची बचत होण्यासाठी इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी सर्वत्र वापरली जात आहे. ही उपकरणे हाताळताना आरएसी टेक्निशियन यांना सुलभतेने काम करता यावे यासाठी आरएसी टेक्निशियन असोसिएशन, रत्नागिरी यांच्यावतीने रविवार २६ रोजी तसेच सोमवार २७ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर वासावे, मुदस्सर ठाकूर यांच्याशी संपर्क करावा.