एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:48 PM2020-06-02T13:48:03+5:302020-06-02T13:49:12+5:30
कोकणामध्ये 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ ची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे या टीम मध्ये 18 जवान सोबत 2 अधिकारण्याचा समावेश आहे.
चिपळूण/रत्नागिरी : कोकणामध्ये 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ ची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे या टीम मध्ये 18 जवान सोबत 2 अधिकारण्याचा समावेश आहे.
एनडी आरएफ टीम चिपळूण येथे लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित चिपळूण येथे आले आहेत. येथील आज समुद्र किनारपट्टी ची पाहणी करणार आहे
हवामान खात्याने सांगितल्या प्रमाणे तीन तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकांनी सोताची काळजी घ्यावी व घरातून बाहेर पडू नये . त्यासंदर्भात सावध आणि घरी राहण्याच्या सूचना तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत।