संरक्षण कायद्याची माहिती हवी : जाधव

By admin | Published: December 15, 2014 10:14 PM2014-12-15T22:14:23+5:302014-12-16T00:14:18+5:30

मूलभूत हक्क मिळविण्यासाठी कायद्याचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे

Need Protection Act: Jadhav | संरक्षण कायद्याची माहिती हवी : जाधव

संरक्षण कायद्याची माहिती हवी : जाधव

Next

चिपळूण : सर्वांचे जीवनमान सुधारण्यासाठी मूलभूत हक्क, कर्तव्य यांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची कलमे, घटनेची माहिती व विविध संरक्षणाचे कायदे यांची माहिती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एस. एम. जाधव यांनी केले. राष्ट्रीय मानवाधिकार एवं पुनरुद्धार संघटन, नवी दिल्ली शाखा, चिपळूणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सहन्यायाधीश आर. डी. नडगदल्ली, चिपळूण बार असोसिएशनचे अ‍ॅड. जीवन रेळेकर, मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिनेश माटे, किशोर पांडे, कोकण संघटक मनोहर शिंदे, सरचिटणीस जगदीश वाघुळदे, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, उपाध्यक्ष अनंत सुतार, गणेश सोनवणे, चंद्रकांत मांडवकर, श्रीनिवास परांजपे आदींची उपस्थिती होती. यावेळी दिवाणी न्यायाधीश जाधव यांनी जीवनमान सुधारण्यासाठी संरक्षण कायद्याची तपशिलवार माहिती असणे गरजेचे आहे. नवनवीन कायद्याची माहिती प्रत्येकाला असेल, तर त्यातून आपण अधिक सजग होऊ शकतो, असे ते म्हणाले. नडगदल्ली यांनी आपल्या हक्काची पायमल्ली होऊ नये, याबद्दल प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मूलभूत हक्क मिळविण्यासाठी कायद्याचा अभ्यास करणेही महत्त्वाचे आहे. मंदार ओक, रामानंद पुजारी, अभिजीत चव्हाण, वाजिद अंतुले, धनराज सावंत, सूर्यकांत चव्हाण, श्रीनिवास परांजपे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. अनंत सुतार यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Need Protection Act: Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.