गरजवंतांसाठी आरक्षण पाहिजे

By admin | Published: October 9, 2016 11:39 PM2016-10-09T23:39:32+5:302016-10-09T23:39:32+5:30

गिरीष बापट : महाराष्ट्र परिट समाजाची पुणे येथे खास आरक्षण परिषद

Need a reservation for the needy | गरजवंतांसाठी आरक्षण पाहिजे

गरजवंतांसाठी आरक्षण पाहिजे

Next

चिपळूण : मराठा समाजाला आरक्षण देताना कायद्यात तरतूद करण्याची गरज पडल्यास आमच्या सरकारची तशी तयारी आहे. ज्या समाजाला खरच आरक्षणाची गरज आहे, अशा समाजाला नक्की आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
पिंपरी - चिंचवड येथे रजकदूत मासिक व महाराष्ट्र परिट युवा संघटनेतर्फे प्र. के. अत्रे नाट्यगृहात आयोजित परिट आरक्षण परिषदेत मंत्री बाटप बोलत होते. यावेळी उद्योजक रमाकांत कदम, उपजिल्हाधिकारी संजय कदम, डॉ. विरेंद्र वाघमारे, तुकाराम दळवी, सुरेश नाशिककर, राजाराम रसाळ, संजय पवार, शहराध्यक्ष रामदास जाधव, महिलाध्यक्ष वैशाली राऊत, लॉड्री संघटनेचे सुनील पवार, विशाल जाधव, बन्सी पारडे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक कदम, कार्याध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम, सल्लागार हसमुख पांगारकर, सचिव संतोष शिंदे, पांडुरंग सातारकर, मंदार पाटेकर, श्रीकृष्ण शिंदे उपस्थित होते.
परिषदेचे मुख्य संयोजक महाराष्ट्र परिट समाज युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष भालेकर यांनी मंत्री बापट यांचा सत्कार केला. परिट समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. १९६०पूर्वी हा समाज अनुसूचित जातीत होता. त्यानंतर मात्र या समाजाला ओबीसीमध्ये टाकण्यात आले. २००२चा डॉ. दशरथ भांडे अहवाल लागू केल्यास पूर्वीचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळेल, यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे भालेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Need a reservation for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.