जलयुक्त शिवारचं पुढचं पाऊल ७३ गावांचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:52 AM2017-08-08T00:52:40+5:302017-08-08T00:52:40+5:30

The next step of the water tank is 73 villages | जलयुक्त शिवारचं पुढचं पाऊल ७३ गावांचं

जलयुक्त शिवारचं पुढचं पाऊल ७३ गावांचं

Next



मेहरुन नाकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील कामे सुरू असून, तिसरा टप्पा राबवण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तिसºया टप्प्यासाठी जिल्ह्यातून ७३ गावांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे काम २०१५ - १६मध्ये झाले. जिल्ह्यातील ४५ गावांतून ही योजना राबवण्यात येत असताना १६२७ कामांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी आतापर्यंत १६१० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३१ कोटी २८ लाख ५८ हजार रूपये खर्च झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू असतानाच दुसºया टप्प्याचे काम २०१६-१७ साली सुरू झाले. दुसºया टप्प्यांतर्गत २७ गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी २१ कोटी ८८ लाख १२ हजार रूपयांचा निधीही मंजूर झाला होता. प्रत्यक्षात ७५३ कामांचे उद्दिष्ट असताना ६९६ कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, आतापर्यंत यातील ४३७ कामे पूर्ण झाली असून, ८६ कामे सुरू असून, अद्याप २३६ कामे होेणे बाकी आहेत. आतापर्यंतच्या कामासाठी एकूण ३ कोटी १६ लाख ६१ हजार रूपये इतका निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवारच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असता, राज्यभरातील दुसºया टप्प्यातील सर्व कामे जूनअखेर पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत निम्म्याहून अधिक कामे पूर्ण झाली असली, तरी ३१६ कामे प्रलंबित आहेत. शिवाय पहिल्या टप्प्यातील १७ कामे रखडली आहेत.
तिसरा टप्पा २०१७-१८मध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या दोन टप्प्यासाठी गावाची निवड करताना जे निकष लावण्यात आले, त्याच निकषाच्या आधारे तिसºया टप्प्यासाठी गावांची निवड केली जाणार आहे.
जिल्हाभरात फळबाग लागवड, वृक्षलागवड करण्याबरोबरच सलग समतल चर, अनगड दगडीबांध, सिमेंट नालाबांध, वळण नालाबांध, शेततळी बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून एकूण ७३ गावांची निवड केली जाणार आहे. चार तालुक्यातील गावांची नावे सुचविण्यात आली आहेत. मात्र, पाच तालुक्यांनी अद्याप नावांची यादी पाठवलेली नाही.
दापोली तालुक्यातून बुरोंडी, हर्णै, इळणे, किन्नळ, पालगड, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, पावनळ, केळशी, चंद्रनगर, गावतळे, कुडावळे, रत्नागिरी तालुक्यातून मिरवणे, देऊड, उक्षी, मंडणगड तालुक्यातून सोवळी, आंबवणे बुद्रुक, कुडूक खुर्द, नारगोली, वेळास, तळेघर, जावळे, राजापूर तालुक्यातून केळवली, होळी, कोंड्ये तर्फ सांैदळ, हसोळ तर्फ सौंदळ, कुंभवडे, तुळसवडे, मंदरूळ, गोठणेदोनिवडे, जैतापूर या गावांची निवड करून यादी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.

Web Title: The next step of the water tank is 73 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.