निकिता आकुर्डे यांना ‘उपक्रमशील शिक्षिका’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:00+5:302021-04-17T04:31:00+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळा टिके फुटकवाडी नं. ४ मधील निकिता शीतलकुमार आकुर्डे यांना टिके केंद्रातील ‘उपक्रमशील शिक्षिका’ पुरस्कार ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळा टिके फुटकवाडी नं. ४ मधील निकिता शीतलकुमार आकुर्डे यांना टिके केंद्रातील ‘उपक्रमशील शिक्षिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी, स्वरचित कवितेमधील विद्यार्थ्यांचे यश, समाज संपर्क, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबतीत निकिता आकुर्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानुसार त्यांना टिके केंद्रस्तर उपक्रमशील शिक्षिका हा बहुमान मिळाला.
जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या देवयानी झापडेकर, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र झापडेकर यांच्याहस्ते निकिता आकुर्डे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख उल्हास पटवर्धन, उदय शिंदे, इंद्रनील नागवेकर उपस्थित होते.
निकिता आकुर्डे यांना पुरस्कार मिळाल्याने टिके सरपंच साक्षी फुटक, उपसरपंच भिकाजी शिनगारे, संपदा फुटक, पोलीसपाटील अरुण फुटक, तंटामुक्त अध्यक्ष यशवंत आलीम, मुख्याध्यापिका सुप्रिया भागवत यांनी अभिनंदन केले आहे.