नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:01 PM2019-04-10T23:01:56+5:302019-04-10T23:02:04+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे ...

Nilesh Rane has filed a complaint against him | नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार नीलेश राणे व त्यांच्यासोबत असलेल्या १६ जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी मध्यरात्री १२.०५ ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नीलेश राणेंसह सहकाऱ्यांविरोधात रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक मंगळवारी रात्री पावणेबारा वाजल्यापासून हातखंबा येथे वाहनांची तपासणी करीत होते. रात्री १२.०५ वाजता नीलेश राणे सहकाऱ्यांसह तेथे आले. त्यांची वाहने तपासणीसाठी पोलिसांनी थांबवली. मात्र, त्यावेळी नीलेश राणे व त्यांच्या सहकाºयांनी अश्लील शिवीगाळ तसेच आरडाओरडा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची धमकी दिली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. बेकायदेशीर जमाव गोळा करून जमावबंदी आदेशाचाही भंग केला, असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप हातखंबा येथे नेमके काय घडले याची माहिती घेण्यासाठी तेथे आले. मात्र, अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने नीलेश राणे व त्यांचे सहकारी त्यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी जाण्याची सूचना केल्यानंतरही ते तेथेच थांबून शिवीगाळ करीत होते, असेही इंगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम १४३, १४५, १४९, १५१, १५३, १८६, २९४, ३५२, ५०४, ५०६ तसेच सह. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, ११०/११७, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील अधिक तपास करीत आहेत.
अन्य वाहनेही तपासा
हातखंबा येथे मंगळवारी मध्यरात्री स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांच्या ताफ्यातील वाहने पोलिसांनी तपासणीसाठी थांबविली. त्यानंतर नीलेश राणे व सहकाºयांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. त्यावेळी नीलेश राणे यांनी आमचीच वाहने का तपासता, अन्य वाहने का तपासली जात नाहीत, असा सवाल केला. त्यानंतर वादावादी झाली व त्यातूनच पुढील प्रकार उद्भवल्याची चर्चा हातखंबा परिसरात आहे.

Web Title: Nilesh Rane has filed a complaint against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.