जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

By admin | Published: July 15, 2014 11:36 PM2014-07-15T23:36:03+5:302014-07-15T23:44:52+5:30

झाडांंच्या फांद्या कोसळल्याने स्थिती

Nine thousand customers in the district in the dark | जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

Next

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आठ हजार ९६७ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळून वीजपुरवठा ठप्प झाल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.
शृंगारतळी उपकेंद्रातील गुहागर वाहिनी रात्री ७.३६ ते ९.४५ पर्यंत बंद होती. येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोडका आगार वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा करण्यात आला होता. केळशी फाटा वाहिनी रात्री ७.४६ ते १० ४० पर्यंत ठप्प झाली होती.
धारतळे (ता. राजापूर) उपकेंद्रातील नाटे वाहिनी सोमवारी दुपारी १.५५ ते मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. याच उपकेंद्रातील भालावली वाहिनी दुपारी १.२८ ते ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती.
शृंगारतळी उपकेंद्रातील पालशेत वाहिनी दुपारी २.५० ते सायंकाळी ७.५० पर्यंत बंद होती. लांजा उपकेंद्रातील पूनस वाहिनी दुपारी १.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत बंद होती. मार्गताम्हाणे उपकेंद्रातील मालघर वाहिनी दुपारी १२.३० ते ८.४० पर्यंत बंद होती. त्याचा ८ हजार ९६७ ग्राहकांना याचा फटका बसला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा सुरू केला, तर नादुरूस्त वाहिनी दुरूस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अन्य ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.संततधार पाऊस कोसळूनही विजेचे खांब कोसळणे, पीन किंवा डिस्क इन्स्युलेटर पंक्चर होणे, डीपी नादुरूस्त होणे, यांसारखे प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेले नाहीत. त्यामुळे महावितरणचे नुकसान मात्र टळले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nine thousand customers in the district in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.