रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:05+5:302021-07-05T04:20:05+5:30

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर ...

Nine villages in Ratnagiri taluka are affected by eruption | रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

googlenewsNext

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करून ती कोरोनाप्रतिबंधित क्षेत्रे केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरल्यामुळे तेथपर्यंत पोहोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करू नयेत, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मायक्रो नियोजनावर भर दिला गेला. त्यात पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या खाली आणण्याचे नियोजन केले आहे. अधिक बाधित असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ती गावे किंवा वाड्या उद्रेकजन्य भाग म्हणून जाहीर केल्या जात आहेत. तो भाग १४ दिवस कंटेन्मेंट केला जात असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती, उद्योग वसाहतींच्या ठिकाणी असलेल्यांवर लक्ष केंद्रित केले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य भाग म्हणून घोषित केली आहेत. त्या भागात कोरेाना प्रतिबंधित क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहे. बाधित भागातील १०० टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर निगेटिव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

Web Title: Nine villages in Ratnagiri taluka are affected by eruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.