Ratnagiri: राजापुरात नऊवर्षीय बालिकेवर अत्याचार, तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:53 IST2024-12-28T15:52:54+5:302024-12-28T15:53:16+5:30
राजापूर : एका नऊवर्षीय बालिकेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात घडला असून, या प्रकाराची माहिती मिळताच पालकांच्या पायाखालची ...

Ratnagiri: राजापुरात नऊवर्षीय बालिकेवर अत्याचार, तरुणाला अटक
राजापूर : एका नऊवर्षीय बालिकेवर तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार राजापुरात घडला असून, या प्रकाराची माहिती मिळताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याप्रकरणी पालकांनी राजापूर पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करताच पाेलिसांनी पारस भिकाजी आडिवरेकर (२१, रा. राजापूर) याला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता १ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारस याने पीडित नऊवर्षीय मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे पुढे आले आहे. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने घडलेला प्रकार उघडकीस आला. तिची प्रकृती बिघडल्याने प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये संशयित तरुणाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ६४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पाेक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास राजापूर पोलिस करत आहेत.