‘ती’ नितेशची चूकच, मात्र 'त्यावेळी' राष्ट्रप्रेमी मुस्लीम बाजू का घेत नाहीत; नारायण राणेंनी केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:19 PM2024-09-16T12:19:24+5:302024-09-16T12:20:08+5:30
चिपळूण : नितेश राणे यांनी मशीद हा शब्द वापरायला नको होता, ती त्याची चूकच होती. मात्र या देशात राहणारे ...
चिपळूण : नितेश राणे यांनी मशीद हा शब्द वापरायला नको होता, ती त्याची चूकच होती. मात्र या देशात राहणारे राष्ट्रप्रेमी मुस्लीम जेव्हा हिंदू समाजावर, हिंदू महिला व मुलींवर अत्याचार होतो, त्यावेळी का बाजू घेत नाहीत, असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी रविवारी उपस्थित केला.
खा. नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले हाेते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आ. नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, नितेश राणे यांनी याबाबत अगाेदरच खुलासा केला आहे. त्यांना तसे बाेलायचे नव्हते. जर तुम्ही आमच्या देशात येऊन अतिरेकी कारवाया करणार असला तर आम्ही करू, असे त्यांना बाेलायचे हाेते. मात्र त्यांनी मशीद शब्द उच्चारायला नकाे हाेता. ती चूक झाली, असे खासदार राणे म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, सगळेच मुसलमान वाईट नाहीत, भारताबद्दल प्रेम असणारे, भारताचे नागरिक असणारेही मुस्लीम आहेत. पण आमच्या समाजावर, महिलांवर अत्याचार हाेताे, त्यावेळी राष्ट्रप्रेमी मुस्लीम का बाजू घेत नाहीत. आज नितेश राणे ताेंड बंद करतील, पण दुसरा नितेश तयार हाेईल, दुसरा नारायण राणे तयार हाेईल, असेही राणे म्हणाले.
खा. शरद पवार यांच्या टीकेलाही उत्तर देताना खा. राणे म्हणाले की, शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री हाेते. त्यावेळी अत्याचार थांबण्यासाठी त्यांनी काही केले नाही, तुम्ही तीन हजार द्यायचे हाेते, त्यावेळी अशी चांगली याेजना आठवली नाही तुम्हाला, असा प्रश्नही केला.