जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही : राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:31 PM2020-12-03T14:31:18+5:302020-12-03T14:33:59+5:30
Jaitapur atomic energy plant, Vinayak Raut, Ratnagiri जैतापूर येथे कोणताही अणुुऊर्जा प्रकल्प होणार नाही. मात्र, येथील संपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. यातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण : जैतापूर येथे कोणताही अणुुऊर्जा प्रकल्प होणार नाही. मात्र, येथील संपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. यातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमधील पदाधिकार्यांची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. यावर्षी कोरोनामुळे या पदाधिकार्यांना कामाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली आहे. १२ डिसेंबरला रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात यावर निर्णय होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जात आहेत. ठेकेदाराने कंपनी व्यवस्थापन बदलल्यानंतर कामाला गती आली आहे. वाशिष्ठी पुलाचेही काम गतीने सुरू आहे. तिवरे धरण उभारणीबाबत पाठपुरावा सुरूच आहे. धरणासाठी काँक्रिटची भिंत उभारावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे नियोजन आहे. त्या-त्यावेळी आघाडीचे पदाधिकारी संयुक्तीक निर्णय घेतील.