ना शाळा, ना परीक्षा, तरीही पावणेदोन लाख विद्यार्थी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:34+5:302021-06-23T04:21:34+5:30

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे ...

No school, no exam, yet 52 lakh students pass | ना शाळा, ना परीक्षा, तरीही पावणेदोन लाख विद्यार्थी पास

ना शाळा, ना परीक्षा, तरीही पावणेदोन लाख विद्यार्थी पास

googlenewsNext

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. सुरुवातीला पहिली ते नववी व अकरावी त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक लाख ८८ हजार ५२१ विद्यार्थी पास झाले आहेत.

प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने यावर्षीही ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावात नेटवर्कची समस्या आहे, त्याठिकाणी पालक, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. ऑनलाइनमध्ये वेळेची मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे, हे समजणे अवघड आहे. गतवर्षी सहामाहीपर्यंत पाचवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या. पहिली ते चाैथीपर्यंत मात्र एप्रिलपर्यंत ऑनलाइन अध्यापन सुरू होते. वार्षिक परीक्षा रद्द झाली. मात्र, सहामाही व दोन चाचणी परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी तर गुणांचा पाऊसच पाडला. शिवाय सरसकट पासचा मात्र सर्व विद्यार्थांना फायदा झाला. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून मूल्यांकन सुरू आहे.

नेटवर्कची समस्या फारशी उद्भवत नाही. त्यामुळे तास चुकण्याचा प्रश्न नाही.

n मोजक्या तासात बेसिक गोष्टी समजविल्या जातात. त्यामुळे खासगी जादा तासात या गोष्टी शहरातील मुले समजावून घेतात.

n तांत्रिक गोष्टी हाताळता येत असल्याने ऑनलाइन अध्यापन सोपे झाले आहे.

n नेटवर्क समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

n गोरगरीब पालकांकडे ॲण्ड्राॅइड मोबाइल उपलब्ध नसल्यामुळे मुलांच्या अध्यापनाचा प्रश्न निर्माण होतो.

n आठवड्यातून तीन ते चार दिवस शिक्षक प्रत्यक्ष वर्ग घेत असल्यामुळे मुलांना त्याचा फायदा अभ्यासासाठी होत आहे.

फायदे

n ऑनलाइनमुळे शाळेच्या अध्यापनाचे तास कमी झाले आहेत.

n प्रत्यक्ष विद्यार्थी समोर नसल्याने शिक्षकांचे लक्ष चुकविले जाते.

n सरसकट पासच्या निर्णयामुळे अभ्यासात कमजोर असणाऱ्या मुलांनाही फायदा झाला आहे.

n दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही सरसकट पासचा लाभ झाला आहे.

तोटे

n वेळेची मर्यादा असल्याने शिक्षकांना अध्यापनासाठी कसब लावावे लागते.

n विद्यार्थी समोर नसल्याने प्रत्यक्ष मुलांना किती आकलन झाले समजत नाही. मुलेही सांगत नाहीत.

n सरसकट पासच्या निर्णयाचा सर्वांना फायदा झाला असला तरी भविष्यातील करिअरसाठी मात्र तोटाच आहे.

Web Title: No school, no exam, yet 52 lakh students pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.