उदयनराजेंसाठी वेगळा कायदा नाही : दिपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:31 PM2017-07-22T18:31:07+5:302017-07-22T18:31:34+5:30

रोड शो कडे दुर्लक्ष केले असल्यास पोलिस कर्मचाऱ्यावरही कारवाई करणार

No separate law for Udayan Raje: Deepak Kejarkar | उदयनराजेंसाठी वेगळा कायदा नाही : दिपक केसरकर

उदयनराजेंसाठी वेगळा कायदा नाही : दिपक केसरकर

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.२२ : कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई होईल. त्यांनी रोड शो केला तरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले जे पोलीस कर्मचारी याला जबाबदार आहेत.त्यांच्यावर कारवाई करु असे वक्तव्य गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शनिवारी केले. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लोणंद (सातारा) येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ९ जणांना अटकही करण्यातआली आहे. या प्रकरणी तीन दिवसांपूर्वी उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

या पार्श्वभूमीवर उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात होते. शुक्रवारी रात्री उदयनराजे साताऱ्यात दाखल झाले. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. उदयनराजे स्वत: पोलीसांना शरण जातील असे बोलले जात होते. मात्र, समर्थकांसह रोड शो करीत उदयनराजेंनी शरण जाण्याला बगल दिली.

याबाबत गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना विचारले असता ते म्हणाले, सर्वांना नियम आणि कायदे सारखेच आहेत. याबाबत चौकशी करेन. तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवश्यक ती कारवाई करण्याची सुचना देण्यात येईल. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला. असतानाही उदयनराजे रोड शो करीत असतील तर पोलीसांचा यात निष्काळजीपणा दिसून येतो. पोलीसांनी जर हा रोड शो पाहीला असेल तर कारवाई करणे आवश्यक होते. त्यामध्ये काही पोलीस उपस्थित असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Web Title: No separate law for Udayan Raje: Deepak Kejarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.