काेविडग्रस्तांसाठी राजकारण विरहित पर्याय उपलब्ध : याेगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:34+5:302021-05-29T04:24:34+5:30
मंडणगड : तालुक्यातील वाढता कोविड संसर्ग लक्षात घेऊन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या पुढाकाराने भिंगळोली येथील कम्युनिटी सेंटरमध्ये विघ्नहर्ता कोविड सेंटर ...
मंडणगड : तालुक्यातील वाढता कोविड संसर्ग लक्षात घेऊन खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या पुढाकाराने भिंगळोली येथील कम्युनिटी सेंटरमध्ये विघ्नहर्ता कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे़ हा उपक्रम तालुकावासीयांसाठी उपयुक्त ठरेल यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले़ कोविडग्रस्तांची गैरसोय होऊ नये याकरिता राजकारण विरहित दृष्टिकोन ठेवून पर्याय उपलब्ध झाल्याचे याेगेश कदम म्हणाले़
भिंगळाेली येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बाेलत हाेते़ यावेळी तहसीलदार नारायण वेगुर्लेकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान पितळे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. आशिष शिरसे, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, डॉ. उल्हास डंबे, डॉ. आशिष जाधव, डॉ. विजय पेटकर, सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, पंचायत समिती सदस्य आदेश केणे, सरपंच विजया दरवडा उपस्थित हाेते़
या केद्रांचे प्रमुख डॉ. उल्हास डंबे म्हणाले की, केवळ सामाजिक दृष्टिकोनातून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे़ केंद्रांच्या माध्यमातून कोविड रोगावरील सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे सांगितले़ या कार्यक्रमास माजी सभापती अनंत लाखण, नीलेश गोवळे, उपसरपंच संदीप कदम, चेतन सातोपे, दीपक मालुसरे, शिवप्रसाद कामेरीकर, सुरेश दळवी, संतोष पार्टे, विनोद जाधव, प्रतीक पोतनीस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील जिल्हा परिषदेच्या बहुुद्देशीय केंद्राल्या इमारतीचे लोकार्पण आमदार योगेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले.