लोकप्रतिनिधींविना योजना निराधार

By admin | Published: November 17, 2014 10:35 PM2014-11-17T22:35:11+5:302014-11-17T23:21:26+5:30

लाभार्थीच नाहीत : शासनाचे ‘सहाय्य’ आहे, पण लाभार्थींसाठी ‘अर्थ’ नाही

Non-Representative Plan | लोकप्रतिनिधींविना योजना निराधार

लोकप्रतिनिधींविना योजना निराधार

Next

रत्नागिरी : निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजना शासनाकडून अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या योजनांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. म्हणनूच आॅक्टोबर २0१४ अखेर या विशेष योजनांचा १ लाख ५५ हजारपेक्षा अधिक लाभार्थींना लाभ मिळाला आहे. मात्र, यासाठी अगदी ग्रामीण स्तरावरील लोकप्रतिनिधीच प्रयत्न करीत नसल्याने काही तालुक्यांमध्ये काही योजनांचे लाभार्थीच पुढे आलेले नाहीत. मंडणगडात तर विधवा निराधार निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ तसेच अपंग निवृत्तिवेतन योजनांचा एकही लाभार्थी नाही.
शासनाच्या अनेक योजना लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य विनृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिंचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.
प्रशासनाच्या प्रयत्नामुळे या सहा योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यासाठी अगदी ग्रामीण स्तरावरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मात्र, तसेच ते होताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यासाठी प्रतिसाद कमी आहे. जिल्ह्यातील मंडणगड आणि संगमेश्वरात तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा एकही लाभार्थी नाही, तसेच तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना यांचा एकही लाभार्थी नाही, तर मंडणगडमध्ये या तीन योजनांचा एकही लाभार्थी नाही.
शासनाने या विशेष योजनांसाठी ‘जगणं’ नावाची योजनांविषयक सविस्तर माहिती असलेली एक पुस्तिका प्रसिद्धीसाठी केली आहे. ही पुस्तिका अगदी ग्रामपंचायत स्तरावर देऊनही ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी या योजना आपल्या भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत बरेच उदासीन असलेले दिसून येतात. त्यामुळे अनेक योजना ग्रामीण भागात बारगळल्या आहेत. (प्रतिनिधी)


विशेष निराधार योजनांचे जिल्ह्यातील लाभार्थी (तालुकानिहाय)
तालुकामंडणगडदापोलीखेडचिपळूणगुहागरसंगमेश्वररत्नागिरीलांजाराजापूरएकूण
संजय गांधी३०७१२३६१३५१२११५१०३३१९३५१४९३८८८१२५५११६१३
श्रावणबाळ५३२१९६४१६००२२८९१२२३२४२२१३५०९९८१७५८१४१३६
वृद्धापकाळ४४९१३१३११५४१६१०८६११९७८८९३७१७१०९९१००७४
कुटुंब लाभ०००४१३१७११०००८०५०८६८
विधवा००३२१४१७९१९२१९४१३८९७६२९०८
अपंग०००००२१७०६२९१११७०१८३
एकूण१२८८४५४९४१३४६२२७३३२६६५५८३८९३२७२२४१८३३६८८२


निराशा...
मंडणगडात राष्ट्रीय कुटुंब लाभ, विधवा, अपंग योजनांचे लाभार्थीच नाहीत.
स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता.
प्रशासनाच्या प्रयत्नामुळे सहा योजनेच्या लाभार्थी संख्येत झाली वाढ.

Web Title: Non-Representative Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.