एक सामान्य फल उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:39+5:302021-04-26T04:28:39+5:30

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच ...

A normal fruit grower | एक सामान्य फल उत्पादक

एक सामान्य फल उत्पादक

Next

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच झाले आहे. रत्नागिरीकर येथे आलेल्या प्रत्येकाला तृप्त करतात. ते इथल्या रसाळ आणि गोड फळांनी. एप्रिल-मे महिन्यात रत्नागिरीत जणूकाही सोनेच पिकते असे म्हटले तरीदेखील ते काही अयोग्य ठरणार नाही. आंबा, काजू, फणस, करवंद, अशा प्रत्येकाच्या जिभेला व हृदयाला संतुष्ट करणारा कोकणमेवा मिळतो तो या उन्हाळी सुटीतच. मग या दोन महिन्यांच्या उत्पादनावर वर्षभर टिकतील असे पदार्थ तयार करण्याची मौजही सुरू होते. हा कोकण मेवा म्हणजे कोकणी लोकांचे वैभव आहे. कोकणकर फल उत्पादक वर्षभराची पुंजी कमावतो ते या कालावधीतच. त्यामुळे कोकणकरांसाठी आंबा, काजू व त्यांचा उदरनिर्वाहाचे एक साधनच आहे.

दरवर्षीच आपल्या कष्टाचं फळ म्हणजेच आंबा, काजू उत्पान हे अगदी भरघोस येते. पण यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा, काजू या दोन्हींचे प्रमाण कमी आहे आणि त्यात भर म्हणून की काय दोन दिवस झालेल्या गारपिठीसह अवकाळी पावसामुळे आंबा पीक घेण्यात आले आहे. या आकस्मिक पावसामुळे फळांवर बुरशी येऊन काळे ढग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जोरदार पावसातील गारांचा फुटण्यामुळे फळ काळे पडून पिकण्यास अडचण निर्माण होत आहे. या साऱ्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली दिसून येते. पावसाच्या काहीच दिवस अगोदर केलेली फवारणी पूर्णत: वाया गेली आहे. त्यावर इलाज म्हणून आता पुन्हा दोनदा फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्याच्या या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत आंबा, काजूस योग्य ती बाजारपेठही उपलब्ध होत नाही. त्यामुळे जे काही फळ हाती लागले आहे त्याची योग्य त्या भावात विक्री करणे अशक्य होऊन बसले आहे. त्या सर्व परिस्थितीत भडला जातोय तो एक सामान्य फल उत्पादक.

आंबा, काजू ही हंगामी फळे असल्याने वर्षभर मेहनत घेऊन त्याचे पीक येते. ते विशिष्ट कालावधीपुरतेच पण योग्यवेळीच जर त्याची विक्री नाही झाली तर मात्र वर्षभर घेतलेली सारी मेहनत व खर्च हा वाया जातो आणि मग एक निराशाजनक परिस्थिती ओढवते. साºया परिस्थितीचा अंदाज घेऊन फल उत्पादकांवर त्यांचे फळ हे कमी किमतीत पिकावे लागते. म्हणजे त्यांच्या फळाला योग्य तो भाव मिळत नाही. यावर्षी पण कोपलेला निसर्ग व कोरोना यामुळे आंबा व काजूचे गाव हे उतरले आहेत. आंबा फळ हे ३००० प्रति पेटी बाजारात मिळत आहे.

अशी ही कठीण परिस्थिती पाहिली की मग नवउत्पादकदेखील फळ लागवडीकडे न वळण्याचा निर्णय घेताना दिसतात. असे झाले तर कोकणचे वैभव असणारी ही फळे काही दिवसांनी सोन्याचा गावात पिकतांना दिसतील तर काही काळाने नामशेषदेखील होतील. हे सारे थांबवायचे असेल तर सरकारकडून योग्य ती आर्थिक मदत व आपणा सगळ्यांकडून साहाय्य व नवउत्तेजन मिळणे गरजेचे आहे. तरच ही कोकणाकडे असलेली वैभवशाली परंपरा अबाधित राहील.

Web Title: A normal fruit grower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.