समिती नसल्याने निराधार वाऱ्यावर

By admin | Published: February 9, 2015 10:34 PM2015-02-09T22:34:43+5:302015-02-10T00:05:42+5:30

रत्नागिरी तालुका : ३४ अपंगांसह ४० विधवांना मिळाला आधार

Not a committee, because of a helpless wind | समिती नसल्याने निराधार वाऱ्यावर

समिती नसल्याने निराधार वाऱ्यावर

Next

रत्नागिरी : संजय गांधी निराधार योजनेच्या विविध १६३ प्रस्तावांना प्रांताधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली असून, तालुक्यातील ३४ अपंगांना आणि ४० निराधार महिलांना या योजनांचा लाभ मिळाला आहे. नव्या पालकमंत्र्यांची निवड झाली असली तरी अजूनही या योजनेच्या समितीचा पत्ताच नाही. समिती स्थापनेला बहुधा मार्चनंतर मुहूर्त मिळेल, असा कयास व्यक्त केला जात आहे.
विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.योजनेचे प्रस्ताव निवडीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येते. ही निवड जिल्हाधिकारी करतात. गतवर्षीची समिती पालकमंत्री बदलल्याने बरखास्त करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर यांची निवड झाली असली तरी अद्याप नवीन समिती स्थापन करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रस्ताव मंजुरीचे अधिकार संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दर तीन महिन्यांनी होणाऱ्या समितीच्या बैठकीत प्रस्तावांची निवड केली जाते.तालुक्यातील प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या त्रीसदस्यीय समितीसमोर विविध योजनांचे १६५ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी १६३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर दोन प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने ते पुन्हा सादर करण्यास सांगण्यात आले.
एकूण प्रस्तावांपैकी संजय गांधी निराधार योजनेच्या तालुक्यातील तब्बल ८५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे (दारिद्र्यरेषेच्या यादीत असलेले) १४, तर दारिद्र्यरेषेच्या यादीत नसलेले ५७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एक अशा एकूण १६३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
निराधार घटकांसाठी या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील निराधारांना मिळवून देण्यासाठी समाजातून प्रयत्न व्हावा, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे करण्यात आले आहे. लवकरच अशा समित्या पुनर्रर्नियुक्त होतील एसो प्रयत््न आ्हेत. (प्रतिनिधी)

संजय गांधी निराधार योजना

तालुक्यातील तब्बल प्रस्ताव मंजूर.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन प्रस्ताव.
दारिद्र्यरेषेच्या यादीत असलेले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन प्रस्ताव
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन प्रस्ताव दारिद्र्यरेषेच्या यादीत नसलेले.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा प्रस्ताव.

Web Title: Not a committee, because of a helpless wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.