प्लास्टिक बंदीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कारखान्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:51 PM2018-07-16T12:51:21+5:302018-07-16T12:52:39+5:30

प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ११, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ अशा एकूण १७ कारखान्यांना प्रस्तावित आदेशाच्या नोटीस बजावण्या आल्या आहेत.

Notice to the factories of Ratnagiri, Sindhudurg after plastic ban | प्लास्टिक बंदीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कारखान्यांना नोटीस

प्लास्टिक बंदीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कारखान्यांना नोटीस

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी, १५ दिवसात म्हणणे मांडारत्नागिरीतील ११ व सिंधुदुर्गातील ६ कारखान्यांचा समावेश

रत्नागिरी : प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टिक उत्पादन घेणाऱ्या उद्योगांवर गंडांतर आले आहे. प्लास्टिक बंदीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभर प्लास्टिक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील ११, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ अशा एकूण १७ कारखान्यांना प्रस्तावित आदेशाच्या नोटीस बजावण्या आल्या आहेत.

शासनाने अलिकडेच राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी जाहीर केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत काही शिथिलता दिली आहे. प्लास्टिक बंदीबाबत शासनाने नव्याने दिलेल्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी प्लास्टिकचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक आहे. त्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून या उद्योगांची तपासणी करून यावेळी काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांना प्रस्तावित आदेश काढून १५ दिवसांत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने केलेल्या तपासणीत रत्नागिरीतील जीएमजी फुडस् अ‍ॅण्ड बेव्हरेज, ताम्हणकर इंडस्ट्रीज, डी. के. टेक्नॉलॉजी, नैवेद्यम डायनिंग प्रा. लि., तसेच चिपळूण खेर्डी एमआयडीसीतील मल्टीफिल्म प्लास्टिक प्रा. लि.चे दोन्ही उद्योग, मिस्टीकल टेक प्लास्टिक प्रा. लि., तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री स्वामी इंडस्ट्रीज आणि गाणे-खडपोली एमआयडीसीतील आशू प्लास्टिक इंडस्ट्रीज अशा सहा कारखान्यांना शासनाच्या प्रस्तावित प्लास्टिकबंदी आदेशाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील श्री अ‍ॅक्वा प्युरिफायर प्रा. लि., कणकवली येथील भद्रकाली मिनरल वॉटर इंडस्ट्रीज, जाधव बेव्हरेज प्रा. लि., इपिक्युअर फुडस् अ‍ॅण्ड बेव्हरेज, वैभववाडी येथील श्री स्वामी समर्थ फुडस् यांनाही शासनाच्या प्रस्तावित प्लास्टिकबंदी आदेशाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.

Web Title: Notice to the factories of Ratnagiri, Sindhudurg after plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.