व्यापाऱ्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा जारी

By admin | Published: November 14, 2014 12:18 AM2014-11-14T00:18:23+5:302014-11-14T00:20:36+5:30

देवरूख नगरपंचायत : विविध संघटनांशी केली चर्चा

Notices issued to traders for encroachment | व्यापाऱ्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा जारी

व्यापाऱ्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा जारी

Next

देवरुख : देवरुख शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी देवरुख पोलिसांनी पुढाकार घेऊन नगरपंचायत आणि देवरुखातील विविध संघटनांना सोबत घेऊन एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आता देवरुख नगरपंचायतीच्या वतीने व्यापारीवर्गाला अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतीच्या गटारावर अतिक्रमण करुन आपल्या दुकानाचे साहित्य ठेवले आहे. तसेच गटारावर छप्पर असून, पायऱ्यादेखील बांधलेल्या आहेत. त्यामुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हे अतिक्रमण व गटारावरील साहित्य सात दिवसात काढून घ्यावे अन्यथा नगरपंचायतीमार्फत आपले अतिक्रमण काढून घेण्यात येईल व माल जप्त करण्यात येईल. या साऱ्याचा खर्चदेखील अतिक्रमण केलेल्या व्यक्तींकडून घेण्यात येईल, अशा स्वरुपाची नोटीस देवरूख नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने व्यापाऱ्यांना देण्यात आली
आहे.
देवरुखात पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाजारपेठांतील मार्गावरच दुतर्फा दुकानांसमोर वाहने पार्क केली जातात. तसेच दुकानांसमोर असणाऱ्या दुकानांच्या बोर्डमुळे दोन मोठी वाहने एकाचवेळी जाताना मोठी अडचण निर्माण होते. यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र, सध्या नगरपंचायतीने कठोर भूमिका स्वीकारल्याने यामध्ये कितपत फरक पडतो आणि त्याची ही कार्यवाही किती यशस्वी होते, हे येत्या काही दिवसात दिसून येणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास काहीअंशी देवरुख शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Notices issued to traders for encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.