Ratnagiri: तुमचा मृत्यू होणार आहे, तोवर एन्जॉय करा; धमकीच्या चिठ्ठ्यांमुळे खेडमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 05:51 PM2024-10-05T17:51:15+5:302024-10-05T17:51:15+5:30

खेड : शहरातील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमधील सर्व दुकानांसमोर विविध तारखा टाकून दुकानमालकांना ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या चिठ्ठ्या ...

notices were found in front of all the shops in a shopping mall with various dates and death threats to the shopkeepers In khed Ratnagiri district | Ratnagiri: तुमचा मृत्यू होणार आहे, तोवर एन्जॉय करा; धमकीच्या चिठ्ठ्यांमुळे खेडमध्ये उडाली खळबळ

Ratnagiri: तुमचा मृत्यू होणार आहे, तोवर एन्जॉय करा; धमकीच्या चिठ्ठ्यांमुळे खेडमध्ये उडाली खळबळ

खेड : शहरातील एका सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमधील सर्व दुकानांसमोर विविध तारखा टाकून दुकानमालकांना ठार मारण्याच्या धमक्या लिहिलेल्या चिठ्ठ्या गुरुवारी सकाळी सापडल्या आणि केवळ खेड शहरच नाही तर जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली. खेडमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. अखेर सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे हा प्रकार काही लहान मुलांनी खोडकरपणातून केला असल्याचे शुक्रवारी उघड झाले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

गुरुवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्यांना दुकानाच्या शटरमध्ये चिठ्ठी सापडली. अमुक अमुक तारखेला तुमचा मृत्यू हाेणार आहे, तोपर्यंत एन्जॉय करा, असा संदेश त्यावर लाल शाईच्या पेनाने इंग्रजीमध्ये लिहिण्यात आला होता. हे पाहून शॉपिंग मॉलमधील व्यापारी चांगलेच धास्तावले. यासंदर्भात खेड पोलिस स्थानकाकडे तक्रारीही देण्यात आल्या. या अजब प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खेड पोलिसांनी या संदर्भात डिटेक्टिव्ह ब्रँचच्या माध्यमातून शीघ्रगतीने तपास सुरू केला. गुरुवारी सायंकाळपर्यंत एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले. पण ते खूपच बाहेरील बाजूचे होते. त्यामुळे पोलिसांना निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नव्हते. शुक्रवारी सकाळी मॉलबाजूच्या एका दुकानदाराकडे जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले, त्यावरून हा उद्योग लहान मुलांनी केला असल्याचे स्पष्ट झाले.

लहान मुलांनी सोशल मीडियावर पाहून केलेला हा खोडकरपणा लक्षात घेऊन तक्रारदारांनी तक्रार मागे घेतली. मात्र पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून योग्य समज देऊन मुलांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मॉलच्या मालकांनीदेखील त्यांच्या पालकांना सूचना देत तक्रार मागे घेतली.

Web Title: notices were found in front of all the shops in a shopping mall with various dates and death threats to the shopkeepers In khed Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.