आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:39+5:302021-06-25T04:22:39+5:30
अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजारही बळावतात. या साथीच्या आजारांबराेबरच ...
अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला की, विविध प्रकारचे साथीचे आजारही बळावतात. या साथीच्या आजारांबराेबरच कानाचे आजारही डाेके वर काढतात. पावसात भिजल्याने कानात पाणी जाऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धाेका माेठ्या प्रमाणात संभवताे. नागरिकांना अशी लक्षणे दिसल्यास त्यांनी तत्काळ डाॅक्टरांना दाखविणे गरजेचे आहे. अन्यथा कानाला इजा पाेहाेचून बहिरेपणा येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पावसाळ्यात अनेकजण भिजण्याचा आनंद लुटतात. मात्र, पाऊस कसाही पडत असल्याने कानात पाणी जाऊन कान ओला राहण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कानात बुरशी, बॅक्टेरियाचा धाेका संभवताे. त्यामुळे पावसाळ्यात कान काेरडा ठेवणे अत्यावश्यक असते. पावसाळ्यात किंवा अन्यवेळीही आंघाेळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कापूस घालून राहणे चांगले असते. कानात बुरशी, बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव झाल्यास काेणतेही औषध घालण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनेकजण कानामध्ये खाज आल्यास तेल टाकतात, असे तेल टाकणे हानीकारक असते.
काय घ्याल काळजी?
कान नेहमी काेरडे आणि स्वच्छ ठेवावे. विशेषत: आंघाेळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने काेरडे करावेत. पावसाचे किंवा आंघाेळ करताना कानात पाणी न जाण्यासाठी कानात कापसाचे बाेळे घालून ठेवावेत. कानामध्ये काेणत्याही प्रकारची टाेकदार वस्तू घालून कान साफ करण्याचे टाळावे.
हेडफाेन वापरत असला तर ताे वारंवार निर्जंतुक करून वापरला पाहिजे. कानामध्ये काेणत्याही प्रकारचे तेल टाकू नये. त्यामुळे कानात चिकटपणा राहून, कान ओलसर राहण्याचा धाेका अधिक असताे. कानात बुरशी, बॅक्टेरिया झाल्यास तातडीने डाॅक्टरांना दाखविणे आवश्यक आहे. कान दुखू लागल्यास किंवा पाणी येत असल्यास डाॅक्टरांना दाखवावे.
कानात पाणी गेल्यास कानात ओलावा तयार हाेऊन बुरशी, बॅक्टेरियाचा धाेका उद्भवताे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. या हंगामात दिवसाला १० ते १५ रुग्ण उपचारासाठी येतात. पाणी गेल्याने कान ओलसर हाेऊन चिकटपणा तयार हाेताे. त्यामुळे कानात बुरशी पकडते. असे झाल्यास काहीजण कानात तेल टाकतात. हे तेल आपण निर्जंतुकीकरण करून टाकत नाही. त्यामुळे ते हानीकारक ठरते.
- डाॅ. पराग शशिकांत पाथरे, कान - नाक - घसा तज्ज्ञ, रत्नागिरी
पावसाला सुरूवात झाली की, अनेकांना पावसात मनसाेक्त भिजण्याचा आनंद घेण्याचा माेह हाेताे. पावसात भिजल्यामुळे पावसाचे पाणी कानात जाण्याचा धाेका अधिक असताे. कानात पाणी गेल्यास ताे वेळीच काेरडा न केल्यास ओलावा तसाच राहताे. त्यामुळे कानात बुरशी पकडून कान दुखू लागताे. त्यावर वेळीच उपचार न केल्यास जखम हाेऊन त्यातून पाणी येऊ लागते आणि त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा पाेहाेचू शकते.
कानात गेलेले पाणी सहसा काढता येत नाही. त्यामुळे पाणी न जाण्यासाठी कान बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी कानात कापसाचे बाेळे घालून ठेवणे हिताचे आहे. कापसाचे बाेळे न ठेवल्यास कान काेरडा केला पाहिजे. पावसाळ्यात कानाचे विकार माेठ्या प्रमाणात उद्भवतात. त्याचे कारण कानात पाणी जाऊन तयार झालेला ओलावा हेच आहे. कानातील विकार डाेळ्यांना दिसत नसल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणेच फायदेशीर असते.