आता काँग्रेससोबत शिष्टमंडळ भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:42+5:302021-03-31T04:32:42+5:30
असलम शेख यांची गुरुवारी पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत असलम शेख यांनी एक महिन्याच्या कालावधीत आपण ...
असलम शेख यांची गुरुवारी पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत असलम शेख यांनी एक महिन्याच्या कालावधीत आपण योग्य ती कारवाई करू, असे सांगितले होते. परंतु त्यानंतरही पारंपरिक मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरूच आहे.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी या साखळी उपोषणाला नुकतीच भेट दिली. त्या वेळी त्यांनी मत्स्यमंत्री असलम शेख यांच्यासोबत बैठक घडवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी बैठक पार पडली.
दापोली मंडणगड गुहागर मच्छीमार संघर्ष समिती तसेच हर्णे बंदर कमिटी यांच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून, आता काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत मत्स्यमंत्री असलम शेख यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने पारंपरिक मच्छीमार साखळी उपोषण स्थगित करतात की हे उपोषण पुन्हा सुरूच राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
...................
फोटो आहे.