आता आमदारही घेणार गाव दत्तक

By admin | Published: September 7, 2016 11:45 PM2016-09-07T23:45:39+5:302016-09-07T23:53:04+5:30

संसद आदर्श ग्राम योजना : उदय सामंत ओरी, कोंड्येचा विकास करणार

Now the MLA will take the village adopt | आता आमदारही घेणार गाव दत्तक

आता आमदारही घेणार गाव दत्तक

Next

शोभना कांबळे --रत्नागिरी --संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनंतर आता विधानसभेचे आमदारही गाव दत्तक घेऊन त्या गावांचा विकास करणार आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे ओरी (ता. रत्नागिरी) आणि कोंड्ये (ता. संगमेश्वर) अशी दोन गावे दत्तक घेणार असून, दापोलीचे आमदार संजय कदम हे तालुक्यातील हर्णे गाव दत्तक घेणार आहेत.
आता आमदारांनीही आपापल्या विधानसभा मतदार संघातील गाव निवडून ते विकासासाठी दत्तक घ्यावे, असे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघाचे आमदार उदय सामंत यांनी ओरी (ता. रत्नागिरी) आणि कोंड्ये (ता. संगमेश्वर) ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. तर दापोलीचे आमदार संजय कदम यांनी हर्णे (ता. दापोली) हे गाव दत्तक घेतले आहे. राजापूर - लांजाचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अजून दत्तक गावे निवडली नसल्याने हे तीन आमदार कोणती गावे निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गावे दत्तक घेतल्यानंतर या गावांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे सुचविली जाणार असून, आमदार निधीच्या माध्यमातून ही गावे विकसीत केली जाणार आहेत. त्यामुळे आता अशा गावांचा विकास दृष्टीक्षेपात आला आहे. उर्वरित आमदारांनीही दुर्गम भागातील गावे निवडून त्यांचा विकास केला तर खऱ्याअर्थाने ही खेडी स्वयंपूर्ण होतील व त्या गावांमध्ये विकासात्मक कामेही होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गावांचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संसद आदर्श ग्राम योजना राबविली जात आहे. याअंतर्गत खासदारांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात गावे दत्तक घेतली आहेत. या दत्तक गावांचा विकास खासदारांच्या निधीतून करण्यात येणार आहे.
खासदारांनी दत्तक घेतलेली गावे
पहिल्या टप्प्यातील गावे
अमर साबळे : आंबडव (ता. मंडणगड)
गजानन कीर्तीकर : आसूद (ता. दापोली)
हुसेन दलवाई : रामपूर (ता. चिपळूण)
पियुष गोयल : गोळवली (ता. संगमेश्वर)
दुसऱ्या टप्प्यातील गावे
अनंत गीते : पालशेत (ता. गुहागर)
विनायक राऊत : बुरंबाड (ता. संगमेश्वर)
गजानन कीर्तीकर : जालगाव (ता. दापोली)

Web Title: Now the MLA will take the village adopt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.